महाविकास आघाडी निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करणार
मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केला पाहिजे, असं सांगत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून उद्धव ठाकरे यांची घोषणा करण्याची अप्रत्यक्ष मागणी केली होती. त्यावर उद्ध व ठाकरे यांनी सावध प्रतिक्रिया देताना महाविकास आघाडी हाच आमचा चेहरा असल्याचं म्हटलं होतं. आज माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी याबाबतचे आपले पत्ते उघडे केले आहे. शरद पवार यांनी मोठं विधान केलं आहे.शरद पवार यांनी आज मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत भाष्य केलं. आमची आघाडी आहे. हा आमचा सामुदायिक चेहरा आहे. कोणत्याही व्यक्तीबिक्तीबाबत आमचा निर्णय झाला नाही. सामूहिक नेतृत्व हे आमचे सूत्र आहे, असं शरद पवार यांनी जाहीरपणे स्पष्ट केलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडी निवडणुकीतमुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करणार नसल्याचं उघड झालं आहे. निवडणुकीनंतरच मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार ठरणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.