भारतीय संघ तेरा वर्षांनी पुन्हा विश्वविजेता
भारतीय संघाने आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ अखेर संपवला आहे. आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील फायनलमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात फलंदाजांची दमदार कामगिरी आणि गोलंदाजांच्या शानदार गोलंदाजीच्या बळावर भारतीय संघाने दुसऱ्यांदा टी -२० वर्ल्डकप स्पर्धेच्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे.दक्षिण आफ्रिकेला हा सामना जिंकण्यासाठी १७७ धावा करायच्या होत्या. या धावांचा बचाव करताना भारतीय संघाने ७ धावांनी बाजी मारली.
अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर ७ धावांनी विजय मिळवित चषकावर कोरले नाव*
*रंगतदार सामन्यात १७६ धावाचे आव्हानासमोर आफ्रिकेला ८ गड्यांच्या गडयाच्या मोबदल्यात १६९ बनवता आल्या.
www.konkantoday.com