
पुलाला संरक्षक भिंत न बांधल्याने अलोरे-शिरगांव नव्या पुलामुळे घरांना धोका
चिपळूण तालुक्यातील अलोरे-शिरगाव नव्या पुलाच्या सुरू असलेल्या कामात शिरगावच्या उजव्या बाजूस संरक्षण भिंत घातलेली नाही. त्या बाजूने नदीचा प्रवाह मोठ्या प्रमाणावर वाहतो. तिथे संरक्षण भिंत नसल्याने त्या बाजूकडील घरांना मोठा धोका आहे. येथे पाण्याचा मारा होवून तेथील भराव व माती मोठ्या प्रमाणावर वाहून जात आहे. तसेच पूरस्थिती निर्माण झाल्यास नदीचे पाणी आसपासच्या घरांमध्ये घुसते. त्यामुळे तेथे संरक्षण भिंत बांधण्याची मागणी ग्रामस्थांतून करण्यात आली आहे.www.konkantoday.com