डेरवण येथील वालावलकर रूग्णालयात जन आरोग्य योजनेचा ७२०० रूग्णांना लाभ
डेरवण येथील वालावलकर रूग्णालय हे कोकणातील जनतेसाठी वरदान ठरत आहे. गेल्या वर्षी ७ हजार २०० हून अधिक रूग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत पूर्णपणे मोफत उपचारांचा लाभ मिळाला आहे.यामध्ये ६४२ हृदयविकार रूग्णांना अँजिओप्लास्टी आणि बायपास शस्त्रक्रियेमुळे जीवदान मिळाले आहे. त्याचबरोबर विविध प्रकारच्या कर्करोगांचे साडेतीन हजार रूग्ण केमोथेरपी योजनेचा लाभ घेत आहेत. तर रेडिएशन उपचार पद्धतीचा ३१५ रूग्णांना लाभ झाला आहे. तसेच २८० हून अधिक रूग्णांवर कॅन्सर शस्त्रक्रिया केल्या गेल्या. अशा प्रकारे १ हजार ५०० हून अधिक रूग्णांवर विविध प्रकारच्या क्लिष्ट शस्त्रक्रिया केल्या गेल्या यामध्ये मूत्रपिंड निकामी असलेल्या ४४५ लोकांना जीवदान मिळाले आहे. www.konkantoday.com