जिल्हा वैश्य समाज संघटनेचे अध्यक्ष डॉ. विकास शेट्ये यांना वैश्य गौरव पुरस्कार जाहीर
कोकणस्थ वैश्य (संगमेश्वरी) समाज या संस्थेतर्फे दिले जाणारे वैश्य पुरस्कार संस्थेच्यावतीने नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये रत्नागिरी जिल्हा वैश्य समाज संघटनेचे अध्यक्ष डॉ. विकास मधुकर शेट्ये यांना यावर्षीचा वैश्य गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.कोकणस्थ (संगमेश्वरी) वैश्य समाज ही संस्था गेले १३७ वर्षे समाजासाठी कार्यरत आहे. या संस्थेमार्फत दरवर्षी वैश्य वाणी समाजातील विविध क्षेत्रातील प्राविण्य मिळविलेले तसेच विविध सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारे वैश्य वाणी समाज बांधव यांचा वैश्य गौरव पुरस्कार देवून सन्मान केला जातो. यावर्षीचे पुरस्कार जाहीर झाले असून त्यामध्ये मंडणगड येथील वैश्य बांधव व रत्नागिरी जिल्हा वैश्यवाणी समाज सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. विकास शेट्ये यांना जाहीर झाला आहे.www.konkantoday.com