चिपळूण शहरातील मार्कंडी भागात वेश्या व्यवसायाचा अड्डा पोलिसांनी उध्वस्त केला, दोन पीडित महिलांची सुटका;
* एका संशयिताला अटक*चिपळूण शहरातील मार्कंडी भागात शालोम हॉटेलच्या मागील गल्लीत एका इमारतीच्या शेवटच्या मजल्यावर सुरू असणारा वेश्या व्यवसायाचा अड्डा पोलिसांनी काल शुक्रवारी रात्री उध्वस्त केला. यावेळी दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली, तर एका संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले.येथे दोन एजंट होते. यापैकी एकाला पकडण्यात पोलिसांना यश आले असून एकजण फरार झाला. महाविद्यालयापासून हाकेच्या अंतरावर हा प्रकार घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे.www.konkantoday.com