चिपळुणात भर रस्त्यात मच्छीबाजार मांडल्याने वाहतुकीची कोंडी
चिपळूण शहरातील बाजारपूल परिसरात अक्षरशः रस्त्यावरच मच्छी बाजार थाटण्यात आला होता. यामुळे अनेक तास वाहतूककोंडी झाली. याची माहिती मिळताच मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी स्वतः येथे जावून पाहणी करीत संबंधित मच्छी व्यावसायिकांवर कारवाई केली. एवढेच नव्हे तर येथील व्यावसायिकांना लवकरच नोटीस देण्यात येणार असून त्यानंतरही येथे व्यवसाय केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. www.konkantoday.com