खडपोली, अलोरे येथील पुलांची नव्याने उभारणी न झाल्यास आंदोलन -मुराद अडरेकर
चिपळूण तालुक्यातील पिंपळी-नांदिवसे मार्गावरील खडपोली तर पेंढांबे-अलोरे मार्गावरील अलोरे येथील पूल दळणवळणाच्या दृष्टीने फारच उपयुक्त आहेत. २००७ ते २०२२ च्या पुरादरम्यान या पुलावरून पाणी गेलेले आहे. दरम्यानच्या काळात तुटपुंजी दुरूस्ती करून हे पूल वाहतुकीसाठी सुरू करण्यात आले. या पुलांची नव्याने उभारणी व्हावी, यासाठी अनेकवेळा शासन दरबारी व संबंधित विभागाकडे पाठपुरावा करण्यात आला. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष मुराद अडरेकर आक्रमक झाले आहेत. त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता यांना निवेदन देत या पुलाची उभारणी न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. www.konkantoday.com