रत्नागिरीत डेंग्यू रूग्णांची संख्या वाढत चालल्याने नगर परिषद प्रशासन सज्ज
संपूर्ण जिल्ह्याच्या मानाने रत्नागिरी शहरात डेंग्यूरूग्णांची संख्या वाढते आहे. या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत जिल्हा शल्य चिकित्सकांकडून नगर परिषद प्रशासनाला डास प्रतिबंधक उपाययोजना करण्याबाबत पत्र पाठवण्यात आले आहे. त्यामुळे नगर परिषद प्रशासन खडबडून जागे झाले असून रत्नागिरी शहरात ठिकठिकाणी औषध फवारणी तसेच जनजागृतीचे काम सुरू करण्यात आले आहे.पावसाळा सुरू होताच जिल्ह्यात डेंग्यूरूग्णांची संख्या आता वाढायला लागली आहे. जिल्हा शल्य चिकित्सकांच्या माहितीनुसार, जिल्ह्यात सध्या डेंग्यूचे १२७ रूग्ण उपचार घेत आहेत. यात एकट्या रत्नागिरी तालुक्यात ९० तर ग्रामीण भागात ३४ रूग्णांचा समावेश आहे. शहरातील डेंग्यूच्या रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हा आरोग्य विभागाकडून नगर परिषदेला उपाययोजना करण्याची सूचना देण्यात आली आहे.www.konkantoday.com