महावितरणाचा घरोघरी प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय रद्द
घरोघरी प्रीपेड स्मार्ट वीज मीटर बसवण्याचा महावितरणने घेतलेला निर्णय मागे घेण्यात आला आहे. जनतेचा व महाविकास आघाडीने कडाडून विरोध केल्याने राज्य सरकारने हा निर्णय मागे घेतला आहे.महावितरणतर्फे स्मार्ट मीटर बसविण्याच्या योजनेत सबस्टेशनमधील सर्व फीडरवर तसेच वितरण ट्रान्सफॉर्मर आणि सर्व सरकारी कार्यालयांमध्ये स्मार्ट मीटर बसवण्यात येत आहेत. तथापि, सर्वसामान्य ग्राहकांना मात्र प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्यात येणार नसल्याचे महावितरणने काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.काही दिवसांपूर्वी महातिरणने राज्यातील सर्व ग्राहकांना घरी स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्याची घोषणा केली होती. त्याला जनतेने जोरदार विरोध केला. महाविकास आघाडीनेही या निर्णयाचा कडाडून विरोध केला. त्यानंतर राज्याचे उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मार्ट प्रीपेड मीटर्सचा निर्णय मागे घेण्यात आल्याचे जाहीर केले आहे. www.konkantoday.com