
शिवसेना नेते तसेच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे रविवारी रत्नागिरीच्या दौर्यावर
महाराष्ट्राच्या विविध भागांबरोबरच रत्नागिरी जिल्ह्यात पडणार्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यामधील भातशेतीचे तसेच अन्य पिकांचे मोठयाप्रमाणात झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी शिवसेना नेते तसेच युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे रविवारी रत्नागिरी जिल्ह्याच्या दौर्यावर येत आहे. त्यांच्या सोबत रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री रविंद्र वायकर,खासदार विनायक राऊत, म्हाडाचे अध्यक्ष तसेच रत्नागिरीचे आमदार उदय सामंत, जिल्ह्याच्या अन्य विधानसभा क्षेत्राचे आमदार, जिल्हाधिकारी, जिल्हाप्रमुख तसेच शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत.शेतकर्यांच्या न्याय हक्कांसाठी शिवसेना नेहमीच त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहीली आहे. शेतकर्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासनही शिवसेना पक्षप्रमुख उद्वव ठाकरे यांनी दिले आहे. शेतकर्यांना विमा कंपन्यांकडून नुकसान भरपाई मिळावी म्हणुन नुकताच त्यांनी मोर्चाही काढला होता. गेल्या दिवसांपासून अवकाळी पडणार्या पावसामुळे महाराष्ट्राबरोबरच रत्नागिरी जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. यात मंडणगड, दापोली, खेड, गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा व राजापुर या तालुक्यांचा समावेश आहे. येथील शेतकर्यांच्या भातपिकांचे तसेच अन्य पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. आदित्य ठाकरे यांच्या दौर्याला रविवारी सकाळी १० वाजल्यापासून रत्नागिरी विश्रामगृह येथून सुरूवात होत आहे. यावेळी ते जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील शेतकर्यांचे झालेल्या पिकनुकसानाची पाहणी करुन तेथील शेतकर्यांशी चर्चा करणार आहेत. सोमवारी सकाळी १० वाजल्यापासून रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री रविंद्र वायकर उर्वरित तालुक्यातील शेतीच्या झालेल्या नुकसानाची पाहणी करणार आहेत.