
एसटी महामंडळाचे २८० कर्मचारी कोरोना मुक्त झाले
सुमारे एक लाख चार हजार कर्मचारी असलेल्या एसटी महामंडळाचे आतापर्यंत ३८६ कर्मचाऱ्यांना कोव्हिडचा संसर्ग झाला होता. त्यापैकी २८० कर्मचारी कोरोना मुक्त झाले असून आपल्या कर्तव्यावर रुजू होण्यासाठी सज्ज झाले आहेत. तर, ९६ कर्मचारी रूग्णालयात उपचार घेत आहे. आतापर्यंत ११ कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २३ मार्चपासून मुंबई महानगरात अत्यावश्यक कर्मचाऱ्यांची ने-आण करण्याची जबाबदारी शासनाने एसटी महामंडळावर टाकली होती.
www.konkantoday.com