शासनाने सवलत दिल्यामुळे महिला प्रवाशांची गर्दी, शहर बसला १ लाख ७० हजाराचे उत्पन्न
रत्नागिरी शहर वाहतूक बसमध्ये महिलांना तिकिट दरात ५० टक्के सवलत दिल्याने महिलांचा मोठा प्रतिसाद एसटीला मिळत आहे. २३ जूनपासून ही सवलत योजना लागू करण्यात आली होती. तीन दिवसात शहर बसमधून २१ हजार २२७ महिलांनी प्रवास केला असून सुमारे १ लाख ७० हजार ६६० रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाल्याची माहिती एसटी रत्नागिरी विभागाकडून देण्यात आली.राज्य शासनाकडून महिला प्रवाशांसाठी तिकिट दरात ५० टक्के सवलत जाहीर केल्याने महिलावर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झो आहे. २३ जून रोजी पहिल्या दिवशी २ हजार ८५३ महिलांनी शहर वाहतूक बसने प्रवास केला असून २५ हजार २० रुपये इतके उत्पन्न प्राप्त झाले. तर २४ जून रोजी ९ हजार ५८० महिलांनी शहर वाहतूक बसने प्रवास केला. यातून एसटीला ७६ हजार ५२५ रुपये तर ५५ जून रोजी ८ हजार ७९४ महिलांनी शहर बसने प्रवास केला. यातून ६९ हजार ११५ रुपयांचे उत्पन्न एसटीला मिळाल्याचे सांगण्यात आले.www.konkantoday.com