
लांजा तालुक्यातील वीजपुरवठा सुरळीत करा, अजित यशवंतराव यांची मागणी
लांजा शहरासह तालुक्यातील नागरिकांना विजेसंदर्भात सेवा देताना हलगर्जीपणा झाला तर संपूर्ण गावातील लोकांना घेवून इथे येणार, असा इशारा देतानाच पुढील दहा दिवसात लांजा शहरासह तालुक्यातील वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी उपाययोजना करा, असे सांगत राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अजित यशवंतराव यांनी महावितरणच्या अधिकार्यांना १० दिवसांचा अल्टीमेट दिला आहे.गेल्या २ ते ३ महिन्यांपासून लांजा शहरासह तालुक्यातील जनता, व्यापारी महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे हैराण झाले आहेत. सर्वसामान्य लोकांबरोबरच व्यापारीवर्गाचीही यामुळे अडचण होत असून आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. www.konkantoday.com