रत्नागिरी शहरातील धोकादायक असलेल्या तीन इमारतींमधील दुकानांमध्ये ग्राहकांनी जावू नये नगरपरिषदेचा नोटीस बोर्ड
ग्राहकांना कोणताही धोका होऊ नये व त्यांच्या सुरक्षिततेसाठी रत्नागिरी शहरातील धोकादायक असलेल्या तीन इमारतींमधील दुकानांमध्ये ग्राहकांनी जावू नये म्हणून ताकीद देणारा नोटीस बोर्ड त्या इमारतींवर लावले आहेत. या धोकादायक इमारतींमधील गाळेधारकांनी सुरक्षित स्थानी व्यवसाय स्थलांतरित करण्याची नोटीससुद्धा यापूर्वी बजावण्यात आली आहे.रत्नागिरी नगर परिषदेच्या मालकीच्या नवीन भाजी मार्केट, जुने भाजी मार्केट आणि विठ्ठल मंदिर समोरील इमारतींच्या गाळ्यांवर ताकीद देणारे नोटीस बोर्ड लावण्यात आले आहेत. नवीन भाजी मार्केट आणि विठ्ठल मंदिर समोरील इमारतीतील गाळे मोकळे करून रनपच्या ताब्यात देण्याची नोटीस गाळेधारकांना बजावण्यात आली. या नोटीस विरूद्ध हे गाळेधारक न्यायालयात गेले असून, प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.www.konkantoday.com