रत्नागिरी नजिकचा शीळ पूल अखेर वाहतुकीसाठी खुला
रत्नागिरी नजिकच्या शीळ नदीवरील रत्नागिरी-मजगांव-करबुडे मार्गावरील पुलाचे बांधकाम अखेर मार्गी लागले आहेत. त्यामुळे या पूल मार्गावरून ये-जा करणार्या वाहतूकदार, ग्रामस्थांनी गेले २ महिन्यापासून लागून राहिलेली प्रतीक्षा संपली आहे. राष्ट्रवादीचे अल्पसंख्यांक, रत्नागिरी तालुकाध्यक्ष ताजुद्दीन खलफे यांनी समाधान व्यक्त केले.हा पूल मार्गी लावण्यासाठी सातत्याने करण्यात आलेल्या पाठपुराव्यामुळे ठेकेदाराने युद्धपातळीवर काम केले. त्यामुळे २३ जूनपासून शीळ नदीवरील पूल वाहतुकीसाठी खुला झाला आहे. ठेकेदार ओमकार गरदे यांनी शासनाकडून या पुलाच्या कामाचा एक रूपयाही मिळालेला नसतानाही हे काम पूर्ण करून जनतेसाठी वाहतुकीचा मार्ग खुला केल्याचे खलफे यांनी म्हटले आहे. www.konkantoday.com