
मिर्या-नागपूर महामार्गाचे चौपदरीकणाचे काम मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचा संकल्प
रत्नागिरी मिर्या ते नागपूर या महामार्गाचे गेल्या काही महिन्यापासून सुरू असलेल्या चौपदरीकरणाच्या कामाने कमालीची गती घेतलेली आहे. रत्नागिरी ते दख्खन या टप्प्यातील हे चौपदरीकरणाचे काम मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करण्याची अंतिम मुदत आहे. त्या दृष्टीने सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यातील संकटावर मात करत या कालावधीतही या महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आतापर्यंत सुमारे येथील ५४ टक्के चौपदरीकरणाचे काम पूर्णत्वास गेल्याची माहिती मिर्या-नागपूर महामार्ग प्रकल्प अधिकारी वसंत पंदेरकर यांनी दिली.नागपूर ते रत्नागिरी असा ५४८ कि.मी.चा राष्ट्रीय महामार्ग व्हावा, अशी मागणी २००१ पासून जोर धरू लागली होती. त्यासाठी मार्च २०१३ मध्ये महामार्गाची अधिसूचना जारी झाली होती. या राज्यमार्गाचे रूपांतर चौपदरी महामार्गात करण्यासाठी खर्या अर्थाने सर्वेक्षण झाले. त्यानंतर रत्नागिरी मिर्या ते नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरण कामाला गती देण्यात आली. तुळजापूर, लातूर, अहमदपूर, नांदेड, यवतमाळ, वर्धा, बुटीबोरी एमआयडीसी, नागपूर असा पहिला टप्पा आहे. तर सोलापूर, सांगोला, कोल्हापूर, रत्नागिरी असा दुसरा टप्पा निश्चित करण्यात आला.www.konkantoday.com