
पाच सागरी जिल्ह्यामध्ये पाच अत्याधुनिक फायबर नौका तैनात होणार
पावसाळी मासेमारी बंदी कालावधी संपताच महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत जिल्हानिहाय गस्त घालण्यासाठी पाच सागरी जिल्ह्यामध्ये पाच अत्याधुनिक फायबर नौका, महाराष्ट्राच्या तैनात होणार आहेत. येत्या १ ऑगस्टपासून देशाच्या पश्चिम किनार्यावर यांत्रिकी मासेमारीला प्रारंभ होणार असून याकाळात कुठल्याही प्रकारची अनधिकृत मासेमारी होवू नये याची दक्षता फायबर स्पीडबोटीद्वारे घेतली जाणार आहे.यापूर्वी भाडेतत्वावर लाकडी नौका (ट्रॉलर्स) गस्तीसाठी वापरण्यात येत असत. परंतु बदलत्या काळानुसार सरकारने अवैध मच्छीमारीला आळा घालण्याचा निर्णय घेतला आहे.www.konkantoday.com