
स्वदेशी वस्तू ओळखणारे अॅप रत्नागिरीच्या सुपुत्राने विकसित केले
रत्नागिरीच्या सुपुत्राने स्वदेशीवस्तू ओळखणारे अॅप विकसित केले आहे.भारताला आयात करण्याची किमान गरज भासावी, यासाठी आपल्याच देशात साधने आणि संसाधनांची निर्मिती करणे अपेक्षित आहे. त्याचबरोबर आपल्या नेहमीच्या वापरातील कोणत्या गोष्टी भारतीय बनावटीच्या आहेत आणि कोणत्या परदेशांतून आयात केलेल्या आहेत, हेही समजणे आवश्यक आहे.यासाठीच गुहागर (जि. रत्नागिरी) येथील सध्या कल्याणला वास्तव्य असलेल्या सौ. प्रिया आणि रोहित गजानन कदम या दांपत्याने Lvocal हे मोबाइल अॅप विकसित केले आहे. पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारत अभियानाच्या घोषणेनंतर त्यांना या अॅपविषयीची कल्पना सुचली आणि त्यांनी त्यावर दीड महिना मेहनत घेऊन ते विकसित केले.भारतात कोणत्या गोष्टी बनवल्या जातात आणि कोणत्या गोष्टी चीन किंवा इतर देशात तयार होतात, याची माहिती या अॅपवरून मिळविता येईल. ज्यात प्रत्येक वस्तूची माहिती मिळते. त्यामध्ये Search चा पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळे वस्तूचे उत्पादन भारतात तयार केलेले आहे की नाही, याची माहिती मिळू शकते. बहुतेक वेळा लोकांना फक्त भारतात बनणाऱ्या वस्तू विकत घ्यावयाच्या असतात, पण वस्तूंवर त्याची माहिती कोठेही नसते. भारतीय वाटणारे अनेक वस्तू भारतात तयार होत नाहीत. अशा वेळी त्या वस्तूंची माहिती या अॅपवर मिळू शकेल.
गुगल प्लेवर https://play.google.com/store/apps/details?id=com.lvocal.main येथे जाऊन हे अॅप डाउनलोड करता येऊ शकेल. अधिक माहितीसाठी रोहित गजानन कदम (९८१९५९२५०२)यांच्याशी संपर्क साधावा.
www.konkantoday.com