त्याची उंची इतकी होती, की पोलिसांनी उंची मोजायला ठेवलेले उंची मीटर देखील पुरले नाही
सोलापूर ग्रामीण पोलिस दलाच्या पोलिस चालक भरतीसाठी गुरुवारी (ता. २७) आसबेवाडी (ता. मंगळवेढा) येथील उद्धव ईश्वर आसबे हा तरुण आला होता. त्याची उंची इतकी होती, की पोलिसांनी उंची मोजायला ठेवलेले उंची मीटर देखील पुरले नाही.त्यामुळे पोलिसांना जमिनीवर उभा करून त्याची उंची घ्यावी लागली, तेव्हा त्याची उंची २०४ सेंटिमीटर असल्याची नोंद झाली.ग्रामीण पोलिस दलातर्फे ८५ पोलिस शिपाई तर नऊ चालक पदांसाठी सध्या भरती सुरू आहे. शिपाई पदासाठी एकूण चार हजार ३५३ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. दुसरीकडे, नऊ चालक पदांसाठी राज्यभरातून ७१० उमेदवारांनी अर्ज केले आहेत. गुरुवारी ग्रामीण पोलिसांनी चालक पदासाठी अर्ज केलेल्या सर्वच उमेदवारांना (पुरुष, महिला, माजी सैनिक उमेदवार) मैदानी चाचणीसाठी बोलावले होते. सोलापूर तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्या टीमकडे चालक भरतीतील उमेदवारांच्या उंचीचे काम होते. त्यांच्याकडेमंगळवेढ्याचा उद्धव आसबे आला, त्यावेळी त्याची उंची पाहून सर्वच आश्चर्यचकित झाले. तो उंची मीटरमध्ये बसतच नव्हता. तो छाती, उंची व वजनाच्या चाचणीत पास झाला आहे.आतापर्यंतच्या एकूण उमेदवारांमध्ये सर्वाधिक उंची असलेला तो उमेदवार ठरला आहे.www.konkantoday.com