ग्रामीण भागातील बंद बस फेर्या चार दिवसात सुरू करा, अन्यथा आंदोलन, उबाठाचा इशारा
रत्नागिरीतील शहरानजिकच्या ग्रामीण भागासह अगदी तालुकाभरातील अनेक विद्यार्थ्यांना एसटी बसफेर्यांना सुमारे दोन ते अगदी पाच-सहा किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. बसफेर्या सुरू करण्याकडे एसटी महामंडळाने दुर्लक्ष केल्याची ग्रामस्थांची तक्रार घेवून येथील (ठाकरे गट) शिवसनेच्या पदाधिकार्यांनी महामंडळाच्या कार्यालयावर धडक मारली. प्रशासनाने चार दिवसात एसटी बसफेर्या सुरू कराव्यात अन्यथा त्या गावातील विद्यार्थ्यांना घेवून एसटी कार्यालयात आंदोलनाचा इशारा तालुकाप्रमुख बंड्या साळवींनी दिला.तालुक्यात अनेक एसटी बसफेर्या कोरोना काळापासून एसटी प्रशासनाने बंद केल्या. आजही ग्रामीण भागातील त्या एसटी बसफेर्या सुरू झालेल्या नाहीत. विद्यार्थ्यांना शाळेच्या वेळेतील या बसफेर्या सोयीच्या ठरत असत. रत्नागिरी तालुक्यातील उंबरे, हरचेरी, भोके, चिंद्रवली, मिरजोळे आदी भागातील विद्यार्थ्यांना पायपीट करण्याची वेळ येत आहे.www.konkantoday.com