गव्हे येथे दोन वर्षाच्या मुलासह मातेची आत्महत्या

दापोली तालुक्यातील गव्हे येथील सीया सूर ज म्हाब्दी यानी आपल्या दोन वर्ष दोन महिन्याच्या मुलगा समर याच्यासह आज शुक्रवार दिनांक २८ जून रोजी विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे*. घरातील सर्व मंडळी नित्याचे कामाला लागली होती.मात्र काही वेळानंतर घरीतील सीया आणि तिचा मुलगा नसल्याचे घरच्यांचे लक्षात आले.यानंतर शोधाशोध सुरू झाली.मात्र कोठेही सापडत नसल्यामुळे अखेर दापोली पोलीस स्थानकात हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली.ही नोंद सुरू असतानाच विहीरीच्या काठावर चप्पल असल्याचे आढळून आले .शंका बळावल्याने विहिरीत शोध घेतला असता माय लेकराचे मृतदेह आढळून आले ग्रामस्थांनी दोघांचे मृतदेह विहिरी बाहेर काढले.त्यानंतर पंचनामा होऊन सायंकाळी शवविच्छेदन करण्यात आले. आत्महत्याचे कारण कळू शकलेले नाही

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button