
खेड येथील तरूणाला गंडा घालणार्या त्या भामट्याचे मुंबईसह नवी मुंबईतही कारनामे
खेड शहरातील एका तरूणाची २४ लाख ८५ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी येथील पोलिसांनी चंदीगड-हरयाणा येथून गजाआड केलेल्या निरज महेंद्र नांगरा (२२) याने मुंबईसह नवी मुंबईतही ऑनलाईन फसवणूक केल्याचे तपासात उघड झाले आहे. त्याचे कारनामे उघडकीस आणण्यासाठी येथील पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी कंबर कसली आहे. ऑनलाईन फसवणुकीचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. भामट्यास न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.www.konkantoday.com