रत्नागिरी तालुक्यातील शिवार-आंबेरे येथे परजिल्ह्यातून नोकरीसाठी आल्याच्या रागातून तरूणाला मारहाण

रत्नागिरी तालुक्यातील शिवार-आंबेरे येथे परजिल्ह्यातून नोकरीसाठी आल्याच्या रागातून तरूणाला मारहाण करण्यात आली. ही घटना रविवारी रात्री ११ च्या सुमारास घडली. शरद देवीदास हुम (३७, रा. गोळप, रत्नागिरी) असे मारहाण करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी मारहाण करणार्‍या दोघा अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांच्या माहितीनुसार २३ जून रोजी रात्रीच्या सुमारास शरद हुमे हे आपल्या मोटारसायकलवरून शिवार-आंबेरे येथून जात होते. यावेळी अज्ञात दोघा इसमांनी त्यांची मोटरसायकल थांबवली. गाडीची चावी जबरदस्तीने काढून परजिल्ह्यातून इथे नोकरीसाठी आल्याच्या कारणातून हाताने मारहाण केली, अशी तक्रार शरद यांनी पूर्णगड पोलिसांत दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी मारहाण करणार्‍या दोघांविरूद्ध भादंवि कलम ३४१, ३२३, ५०४, ५०६ सह ३४ नुसार गुन्हा दाखल केला. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button