रत्नागिरीकरांची पाण्याची साडेसाती संपेना, शीळ धरण ते जॅकवेल जलवाहिनीचे पाईप प्रवाहात वाहले

रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणार्‍या शीळ धरण ते जॅकवेलपर्यंतच्या जलवाहिनीचे रखडलेले काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. मात्र हे काम अजूनही रखडले आहे. एकूण ५५० मीटरची ही जलवाहिनी असून ते काम मार्गी लावत असतानाच आता नदीपात्रातून टाकण्यात आलेल्या जलवाहिनीचे पाईप पावसामुळे नदीच्या वाढलेल्या प्रवाहामुळे वाहून जाण्याची नामुष्की ओढवली आहे.रत्नागिरी नगर परिषद हद्दीत गेल्या उन्हाळ्यात पाण्याची टंचाई सुरू होती. शहरवासियांना शीळ धरणाती खालावलेल्या पाणीसाठ्यामुळे एकदिवस आड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता. शीळ धरण ते पंपिंग हाऊसपर्यंत पाईपलाईन टाकण्यास झालेल्या विलंबाबाबत ओरड सुरू असताना धरण ते जॅकवेलपर्यंतच्या जलवाहिनी जोडण्याच्या कामाला गती देण्यात आली होती. नळपाणी योजना पूर्ण झाली असताना पंपिंग हाऊसपर्यंत लाईन पूर्ण होणे आवश्यक आहे. हे काम पावसाळ्यापूर्वी तातडीने करण्यात यावे, यासाठी नगर परिषद प्रशासनाचे प्रयत्न सुरू होते. त्यासाठी कलकत्याहून पाईप मागवण्यात आले होते. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button