
भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी रुग्णालयात दाखल; प्रकृती स्थिर!
भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (AIIMS) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ९६ वर्षांच्या आडवाणी यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जाते.तीन महिन्यापूर्वी लालकृष्ण अडवाणी यांना केंद्र सरकारने भारत रत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरविले होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांच्या घरी जाऊन हा पुरस्कार प्रदान केला होता. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, उप राष्ट्रपती जगदीप धनकड, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि लालकृष्ण अडवाणी यांचे कुटुंबिय उपस्थित होते.