बोलेरो-दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचाराच्या दरम्यान मृत्यू

देवरूख नजीकच्या साडवली येथे बोलेरो-दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या कोसुंब फौजदारवाडी येथील प्रदीप शंकर गुरव या तरुणाचा उपचारादरम्यान बुधवारी सकाळी ९ वाजता मृत्यू झाला.प्रदीप गुरव हा गेली अनेक वर्षे जुगाई ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था कोसुंबचा सचिव म्हणून कार्यरत होता. चांगल्या कामाच्या माध्यमातून प्रदीप याने तरूणांना आदर्श घालून दिला आहे. प्रदीपच्या पार्थिवावर कोसुंब येथील स्मशानभूमीत सायंकाळी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. देवरूख-संगमेश्वर मार्गावरील साडवली येथे बोलेरो पिकअप व दुचाकी यांच्यात धडक होवून २० रोजी रात्री १०.३५ च्या सुमारास अपघात झाला. सांगवेयेथील स्वप्निल शेलार हा बोलेरो पिकअप सांगवे ते कोसुबमार्गे साडवली अशी घेवून जात होता. त्याच्यासमवेत ऋत्विक सुहास शेलार हा ही होता. साडवली येथे स्वप्निल शेलार याने बोलेरो अचानक वळविल्याने मोटारसायकल बोलेरो पिकअपवर येवून धडकली. मोटारसायकल प्रदीप शंकर गुरव चालवत होता. यात प्रदीप गुरवच्या डोक्याला गंभीर मार लागला. अपघातप्रकरणी स्वप्निल शेलार यांच्यावर देवरूख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button