पूर्वीच्या वादातून एकावर कोयतीने वार
रत्नागिरी न्यायालय रस्त्यावर आज एकावर कोयतीने वार करण्याची घटना घडली आहे. जखमी झालेल्या इसमाचे नाव योगेश चाळके असे आहे. यामध्ये स्वरूप राऊत व जयसिंग राऊत या दोनजणांना ताब्यात घेण्यात आले आहे. वरील दोघांची व योगेश चाळके यांची पूर्वीची एक केस न्यायालयात चालू होती. त्याच केसची तारीख आज कोर्टात होती. त्यासाठी हे सर्व आले असता हा वार करण्याचा प्रकार घडला आहे. आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून जखमी योगेशवर रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. www.konkantoday.com