पाचल ग्रामपंचायत शिवसेनेकडे, किरण सामंत यांच्या उपस्थितीत सरपंचांसह दोन सदस्यांचा पक्षात प्रवेश
राजापूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या पाचल ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त अपक्ष सरपंच बाबालाल फरास यांनी आपल्या समर्थकांसह रविवारी उद्योजक व शिंदे सेनेचे नेते किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला. यामुळे पाचल ग्रापयंचायत आपल्या ताब्यात घेण्यात शिंदे शिवसेनला यश आले आहे.हा पक्षप्रवेश समारंभ पाचल येथील स्व. कै. गोपाळ आबा नारकर सभागृहात उद्योजक व शिवसेनेचे नेते भैय्या सामंत यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी फरास यांच्यासोबत अन्य दोन ग्रामपंचायत सदस्यांसह त्यांच्या शेकडो समर्थकांनी प्रवेश केला आहे. सरपंच फरास यांनी आपण महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री आणि पालकमंत्री उदय सामंत व उद्योजक व नेते भैय्या सामंत यांच्या कार्यशैलीवर प्रभावित होत शिवसेनेमध्ये प्रवेश केला असल्याचे सांगितले. उद्योजक भैय्या सामंत यांनी मार्गदर्शन करताना यापुढे पाचल ग्रामपंचायतीला निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही दिली. यावेळी शिंदे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अशफाक हाजू, तालुकाप्रमुख दीपक नागले यांच्यासह सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.www.konkantoday.com