परशुराम घाटात दरड कोसळण्याचा धोका, वाहनधारकांत भीती
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटातील चौपदरीकरणाचे काम पूर्णत्वास गेले असले तरी येथील धोका मात्र कायम आहे. काही दिवसांपूर्वीच येथील दरडीकडचा मातीचा भराव व संरक्षक भिंत कोसळण्याची घटना घडली होती. आतातर काही ठिकाणी डोंगर भागातील भले मोठे दगड कोसळण्याच्या स्थितीत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. येथे संरक्षक भिंत नसल्याने हे दगड रस्त्यावर येवून अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग विभाग व ठेकेदार कंपनी यांनी या ठिकाणी तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.www.konkantoday.com