ठेकेदारांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर बांधकामला ९६ कोटींचा निधी
रत्नागिरी जिल्ह्यात ठिकठिकाणी सुरू असलेल्या विकासकामांचा निधी शासनाकडून रखडल्याने मेटाकुटीस आलेल्या ठेकेदारांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर सुमारे ९६ कोटींचा निधी बांधकाम विभागाला प्राप्त झाला आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान दिलेल्या आश्वासनांची सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी पूर्तता केली आहे.शासनाकडून मिळालेल्या या निधीतून जिल्ह्यतील छोट्या ठेकेदारांची विकासकामांची बिले भागवली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र बांधकाम मंत्री चव्हाण यांनी प्राधान्याने मोठ्या ठेकेदारांचा समावेश निधी वाटप करताना करावा असे निर्देश बांधकाम विभागाच्या अधिकार्यांना दिले आहेत. गेले वर्षभर ठेकेदाराला विविध विकासकामांचे पैसे मिळत नसल्याने ठेकेदार विवंचनेत सापडले होते. आर्थिक विवंचनेत असलेल्या ठेकेदारांनी एकत्र येवून आंदोलनाचा इशारा दिला होता. www.konkantoday.com