
जलजीवन मिशन योजनेतील असंख्य कामात गैरव्यवहार, न्यायालयापर्यंत जाण्याची शक्यता
केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन हर घर जल योजनेसाठी जिल्हाभरात सुमारे एक हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी आलेला असताना या योजनेच्या कामात अनेक ठिकाणी गैरव्यवहार झाल्याच्या शेकडो तक्रारी पुढे आल्या आहेत. यामध्ये ठेकेदार, शासकीय अधिकारी व काही लोकप्रतिनिधी यांच्याकडे संशयाची सुई असुन माजी खा. निलेश राणे यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील या योजनेच्या गैरव्यवहारांवर बोट ठेवत ऑडीट करण्याची मागणी लावून धरली आहे. लांजा-राजापुरात तर या योजनेच्या नावाखाली मालामाल झालेले लाभार्थी अधिक असून लांजातील शिपोशीमधील कामाबाबत थेट पोलीस स्थानकात तक्रार गुदरण्यात आली आहे. तर दुसरीकडे लांजातील भाजपच्या एका बड्या नेत्याने या योजनेतील एकूणच कामाच्या पारदर्शक चौकशीसाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे संबंधितांचे धाबे दणाणले आहेत. www.konkantoday.com