चिपळूण शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत कमी न झाल्यास पालिकेवर पुन्हा धडक
भटक्या श्वानांच्या नसबंदीवर चिपळूण नगर पालिका प्रशासनाने लाखो रुपये खर्च केले आहेत. तरीही शहर परिसरात श्वानांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. श्वानांच्या टोळीने शहरात दहशत निर्माण केली असून त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या श्वानांपासून आबालवृद्ध यांना वाचवावे, अन्यथा ज्येष्ठ नागरिक, बालकांना घेवून पुन्हा नगर पालिकेवर धडक देवू, असा इशारा मंगळवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने मुख्याधिकारी विशाल भोसले यांना दिला.www.konkantoday.com