
चिपळूण शहरातील गोवळकोट येथे महिला शौचालयाची अज्ञाताकडून तोडफोड
चिपळूण शहरातील गोवळकोट येथील सार्वजनिक शौचालयाची अज्ञाताने तोडफोड केली आहे. केबिन, पाण्याच्या टाकीत बर्याचदा दगड टाकले जात असून पाईपलाईनही फोडली आहे. त्यामुळे गुन्हेगारांचा शोध घेवून त्याच्यावर कारवाई करा, आवश्यक दुरूस्ती तातडीने करा अशी मागणी येथील महिलांनी मंगळवारी नगर परिषदेवर धडक देत केली.यावेळी संतप्त महिलांनी मुख्याधिकारी भोसले यांना सांगितले की, गोवळकोट देऊळवाडी येथील टाकळे यांच्या घराशेजारी गेल्या अनेक वर्षापासून महिलांसाठी सार्वजनिक शौचालय आहे. त्याचा वापर अनेक वाड्यांमधील महिला करतात, असे असताना कोणीतरी अज्ञात सातत्याने केबिन व पाण्याच्या टाकीत दगड टाकण्यासह पाईप फोडण्याचा प्रताप करीत आहे. www.konkantoday.com