गणेशोत्सवासाठी येणार्या चाकरमान्यांसाठी ७ जुलैपासून एसटीचे बुकींग
कोकणात मोठ्या उत्साहाने साजरा होणार्या गणेशोत्सवासाठी मुंबई-पुण्यातून मोठ्या संख्येने चाकरमानी दाखल होत असतात. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी प्रशासनाने देखील नियोजनाला सुरूवात केली आहे. जुलै महिन्याच्या ७ तारखेपासून गणेशात्सवासाठी एसटीचे बुकींग सुरू करण्यात येणार आहे. महिला, वृद्ध व ज्येष्ठ नागरिकांना एसटीकडून मिळणार्या सुविधांचा विचार करता यावर्षी मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.www.konkantoday.com