
ज्येष्ठ पत्रकार इकबाल भाई जमादार यांना समाजभूषण पुरस्कार 2024 जाहीर
खेड (प्रतिनिधी ) खेड तालुक्यातील संगलट गावचे सुपुत्र आणि जेष्ठ पत्रकार इकबाल भाई जमादार यांना कोकणाचा सन्मान सामाजिक संस्था रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमानाने राज्य व जिल्हास्तरीय पुरस्कार सोहळ्या 2024 मध्य त्यांना आदर्श पत्रकार समाज भूषण पुरस्कार असे नुकतेच जाहीर झाले आहे इक्बाल भाई जमादार हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांच्या सर्व स्तरावरून अभिनंदन व शुभेच्छा देण्यात येत आहे इकबाल जमादार एक सामाजिक कार्यकर्ते बरोबर अनेक सर्व समाज बांधवाला आपल्याबरोबर घेऊन अनेक उपक्रम राबवले आहेत गेल्या 30 वर्षापासून पत्रकार क्षेत्रामध्ये काम करीत असताना त्याने ग्रामपंचायत मध्ये उपसरपंच पदापासून विशेष कार्यकारी अधिकारी तसेच अनेक त्यांना पद व पुरस्कार मिळालेले आहेत 2023 मध्ये 23 व्या कबड्डी दिन सोहळ्यामध्ये कबड्डी महेशश्री शंकरराव बुवा साळवी समृद्धी दिनानिमित्त मुंबईतील गडकरी हॉल या ठिकाणी 15 जुलै 2023 रोजी भव्य सत्कार व मान सन्मान करण्यात आले होते पुरस्कार वितरण सोहळा हा रत्नागिरी येथील मराठा हॉल माळ नाका इथे 30 जून 2024 रोजी संपन्न होणार आहे पुरस्कार वितरण च्या वेली माननीय श्री उदय जी सामंत पालकमंत्री रत्नागिरी तथा उद्योग मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभहस्ते होणार आहे प्रमुख उपस्थित म्हणून श्री देवेंद्र सिंह जिल्हा अधिकारी रत्नागिरी श्री धनंजय कुलकर्णी पोलीस अध्यक्ष रत्नागिरी कीर्तीकरण पुजार कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी श्री भास्कर जगताप जिल्हा शालेय चिकित्सा रत्नागिरी माननीय सोसंग मित्र फुले अध्यक्ष प्रादेशिक मनोरुग्णालय रत्नागिरी माननीय सौ सुवर्णा सावंत माध्यमिक शिक्षण अधिकारी रत्नागिरी व माननीय श्री भैय्या शेठ सांमत ज्येष्ठ उद्योजक आदीच्या उपस्थित जेष्ठ पत्रकार इकबाल जमादार यांचा सत्कार व सन्मान करण्यात येणार आहे