शिरवली (ता. खेड) येथील प्राथमिक शाळेच्या एका वर्गखोलीचे कौलारू छप्पर सोमवारी कोसळले

खेड -गेले दोन दिवस कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे शिरवली (ता. खेड) येथील प्राथमिक शाळेच्या एका वर्गखोलीचे कौलारू छप्पर सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कोसळले. सुदैवाने शाळा सुटल्यानंतर ही दुर्घटना घडल्याने शाळेतील २८ विद्यार्थी वाचले आहेत. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. या दुर्घटनेनंतर शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी मंगळवारी खेडच्या गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. शाळेच्या इमारतीचे उर्वरित छतही मुसळधार पावसात केव्हाही पडू शकते, तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करता जोपर्यंत विद्यार्थ्यांना सुरक्षित पर्याय व्यवस्था होत नाही, तोपर्यंत विद्यार्थ्यांना त्या शाळेत पाठवले जाणार नाही, असे निवेदनात म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button