
लांजा तालुक्यातील आंजणारी, वाडगावमधील टॉवरच्या ३८ बॅटर्या लंपास
चोरट्याने बॅटर्यांचे रॅक तोडून टॉवरच्या १ लाख १४ हजार रुपयांच्या ३८ बॅटर्या लंपास केल्या आहेत. लांजा तालुक्यातील अंजणारी व वाडगाव येथील या घटनेप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याची फिर्याद रितेश शशिकांत रांगोळे (रा. एकता रेसिडेन्सी, १०१, पाग चिपळूण) यांनी पोलिसांत दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शनिवार २२ जून रोजी रात्री ८ ते रविवार २३ जून रोजी सकाळी ८ च्या मुदतीत वाडगाव धनगरवाडी व आंजणारी येथील मोबाईल टॉवरमधून चोरट्याने बॅटरीचे रॅक तोडून बॅटर्या लंपास केल्या. यात वाडगाव धनगरवाडीतील ४८ हजार रु. किंमतीच्या एच.बी.एल. कंपनीच्या १६ बॅटर्या तर आंजणारी येथील टॉवरमधून ६६ हजार रुपये किंमतीच्या एक्साईड कंपनीच्या २२ बॅटर्या लंपास केल्या. या एकूण ३८ बॅटर्यांची किंमत १ लाख १४ हजार रुपये इतकी आहे. या प्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूद्ध भा.दं.वि. कलम ४६१, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास स.पो.फौ. भालचंद्र रेवणे हे करत आहेत.www.konkantoday.com