
रत्नागिरी तालुक्यातील पिरंदवणेत शिवीगाळ केल्याप्रकरणी महिलेची सरपंचाविरूद्ध तक्रार
रत्नागिरी तालुक्यातील पिरंदवणे येथे जागेच्या वादातून सरपंचाने शिवीगाळ केल्याची तक्रार महिलेने रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत दागल केली. साधना सुनित भावे (रा.पिरंदवणे, रत्नागिरी) असे या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी संशयित सरपंचाविरूद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.श्रीकांत गंगाराम मांडवकर (रा. पिरंदवणे, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सरपंचाचे नाव आहे. महिलेकडून दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार पिरंदवणे गावचे सरपंच श्रीकांत मांडवकर यांच्याशी त्यांचा जागेवरून वाद सुरू आहे. २३ जून २०२४ रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास श्रीकांत हे तक्रारदार यांच्या जागेतून जात होते. यावेळी तक्रारदारांनी श्रीकांत यांना अडवून आमच्या जागेतून जायचे नाही, असे बजावले. तक्रारदार यांनी अडल्याचा राग आल्याने त्यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. यावेळी मला कोण अडवतो, तेच मी बघतो, असे म्हणून श्रीकांत यांनी जातीवाचक शिवीगाळ केली. www.konkantoday.com