
रत्नागिरी जिल्हा परिषदेवर दिव्यांग बांधव आपल्या मागण्यांसाठी जिल्हा परिषदेवर धडकले
जि.प. समाजकल्याण विभागाकडे सादर केलेल्या प्रस्तावांमध्ये ज्येष्ठतेनुसार नंबर लागेल. या मानसिकतेमध्ये असलेला जिल्ह्यातील दिव्यांग बांधव, यावर्षी नाही तर पुढील वर्षी आपल्याला लाभ मिळेल म्हणून आशा लावून बसला होता. मात्र त्यांचा भ्रमनिरास झाला. दरम्यान ते परत केलेले प्रस्ताव जिल्हा परिषदेने स्विकारावे म्हणून सोमवारी सुमारे दीडशे दिव्यांग बांधवांनी दिव्यांग समन्वय समितीचे उपाध्यक्ष अशोक भुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेवर धडक दिली.यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव यांच्यासह समाजकल्याण विभागाचा अतिरिक्त पदभार असलेले गटविकास अधिकारी जे. पी. यादव यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. समाजकल्याण विभागाने सन २०१८-१९ पासून दिव्यांग ५ टक्के निधी, जिल्हा परिषद सेस, विविध सहाय्यभूत साधन, रोजगारासाठी वस्तू मिळण्यासाठी केलेले प्रस्ताव तत्सम ग्राम पंचायतीच्या ग्रामसेवकांमार्फत निधी उपलब्ध नाही म्हणून परत देण्यात आले असल्याची कैफियत या मोर्चावेळी दिव्यांग बांधवांनी मांडली. www.konkantoday.com