
दापोली शहरातील मच्छिमार्केट परिसरातील सुवर्णपेढी फोडून पावणेसहा लाखाचा ऐवज लांबवला
दापोली शहरातील मच्छिमार्केट परिसरात असणार्या शुभम ज्वेलर्स या सुवर्णपेढीवर चोरट्याने डल्ला मारून सुमारे ५ लाख ७५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना सोमवारी रात्री ८ ते मंगळवारी सकाळी ८ च्या दरम्यान घडली.मच्छिमार्केट परिसरात आयेशाबी कॉम्प्लेक्स या इमारतीमध्ये शुभम ज्वेलर्स सुवर्णपेढी आहे. पेढीचे मालक संजय तुकाराम वानरकर यांनी सोमवारी रात्री आठ वाजता नेहमीप्रमाणे पेढी बंद केली. मात्र मंगळवारी या पेढीच्या जवळच असणारे दुकानदार गोपाळ चौधरी यांनी वानरकर यांना सकाळी ७.३० च्या सुमारास फोन करून दुकानाचे शटर उचकटले असल्याचे सांगितले. www.konkantoday.com