दापोली तालुक्यात १२७ नवीन गुरूजी हजर झाले

दापोली शिक्षण विभाग शैक्षणिकदृष्ट्या विविध उपक्रम राबविण्यात आघाडीवर आहे. व्हिजन दापोली सारख्या विद्यार्थ्यांच्या बौद्धिकतेच्या दृष्टीने विविध योजना राबवल्या जात आहेत. मात्र यामध्ये कमी शिक्षणसंख्येअभावी येणारा अडसर आता दूर झाला आहे. येथे नव्याने नियुक्त झालेल्या १२७ पैकी १२६ शिक्षक हजर झाले असल्याची माहिती दापोली शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी अण्णासाहेब बळवंतराव यांनी बोलताना दिली.तालुक्यात २६० शाळा आहेत. या शाळांसाठी ७८४ शिक्षक मंजूर आहेत. परंतु सध्या ६६० शिक्षक कार्यरत आहेत. त्यामुळे सध्या १२४ शिक्षकांची कमतरता आहे. मागील शैक्षणिक वर्षात खाजगी शिक्षकांची अध्यापनासाठी नियुक्ती करण्यात आली होती. परंतु आाता शासनाकडून १२७ शिक्षक दापोली शिक्षण विभागाला प्राप्त झाले आहेत. नवीन भरती झालेले हे शिक्षक राज्यातील सर्वच जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे दापोली शिक्षण विभागाकडून त्यांचे दोन दिवसांचे प्रशिक्षण घेण्यात आले. यानंतर त्यांची तालुक्यात आवश्यक तेथे नियुक्ती केली आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button