डंपर खरेदीकरिता ८ लाख रुपये घेवून डंपर न देता फसवणूक
डंपर खरेदी व्यवहारातून तिघांनी एकाची ८ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी त्या तिघांवर सोमवारी चिपळूण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संतोष किसन माने (विसापूर-सांगली), विजय लक्ष्मण माने, आरिफ अल्ताफ फकीर (दोघे, कवठे-सांगली), अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याची फिर्याद जियान शब्बीर काझी (२६, धामणदेवी, खेड) यांनी दिली. पोलिसांच्या माहितीनुसार २४ ऑगस्ट २०२३ रोजी संतोष माने, विजय माने, आरिफ फकीर या तिघांनी रियाज काझी याच्याकडून डंपर गाडीच्या व्यवहारापोटी ता. मिरज, जि. सांगली व चिपळूण येथून एकूण ८ लाख रु. घेतले. मात्र जियान काझीना डंपर न देता तसेच त्यांनी व्यवहारापोटी दिलेले पैसे त्यांना परत न देता त्यांची ८ लाखांची फसवणूक केली. हा प्रकार काझींच्या लक्षात आल्यावर त्यांनी याबाबत चिपळूण पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार संतोष माने, विजय माने, आरिफ फकीर या तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. www.konkantoday.com