
मारूती आळीतून दुचाकी पळविली
मारुतीआळी परिसरात उभी करून ठेवलेली मोटारसायकल अज्ञात चोरांनी पळवून नेली आहे.यातील फिर्यादी हिराबाई बाळासाहेब पाटील राहणार उत्कर्षनगर कुवारबाव यांची दुचाकी MH-09-DL-2887 ही मारुती आळी येथील परकार मशिदीच्या बाजूच्या गल्लीत पार्क करून ठेवली होती. ती अज्ञात चोरट्यांनी पळवून नेली. पाटील यांनी रत्नागिरी पोलीस स्थानकात चोरीची फिर्याद दाखल केली आहे.
www.konkantoday.com