
गणपतीपुळेत अंगारकी संकष्टीनिमित्त ४० हजार भाविकांनी घेतले श्रींचे दर्शन
मुसळधार पाऊस असूनही गणपतीपुळे येथील मंगळवारच्या अंगारकी संकष्टी यात्रोत्सवात सुमारे ४० हजार भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले.कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, इचलकरंजी, कवठे महाकाळ, मिरज, कराड, बेळगाव, इचलकरंजी आदी ठिकाणांहून भाविक मोठ्या संख्येने स्वयंभू श्रींच्या दर्शनासाठी उपस्थित होते. मंगळवारी पहाटे साडेतीन वाजता स्वयंभू गणेश मंदिर खुले करण्यात आले. मुख्य पुजारी अमित घनवटकर यांच्या हस्ते श्रींची पूजा, मंत्र पुष्पांजली झाल्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिरात सोडण्यात आले. भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर परिसरात देवस्थान समितीच्यावतीने चोख व्यवस्था करण्यात आली होती.www.konkantoday.com