खेड नगर परिषदेकडून घरगुती कचरा संकलनासाठी क्यूआर कोड सिस्टीम अंमलात
राज्यात स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ महाराष्ट्र या नव्या प्रयोगांतर्गत घरगुती कचरा संकलनासाठी क्युआर कोड सिस्टीम बसविण्यात येत असून येथील नगरपरिषदेकडून याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली असून गृहनिर्माण संस्थांमध्ये क्यूआर कोड सिस्टीम बसवण्यात येत आहे. याद्वारे रोजच्या रोज घरगुती कचरा संकलित होतो की नाही याची माहिती उपलब्ध होणार आहे.स्वच्छ महाराष्ट्र उपक्रमांतर्गत नगरपरिषद हद्दीतील कचर्याचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन करावे, ओला व सुका कचरा घरातून वर्गीकरण करून घंटागाडीत यावा, याकरिता क्यूआर कोड सिस्टीमचे नियोजन करण्याात आले आहे. नागरिकांनी घरातील कचर्याच्या डब्यावर हे दोन क्यूआर कोड लावायचे आहेत.सुक्या व ओल्या कचर्यासाठी प्रत्येकी एक क्यूआर कोड देण्यात आला आहे. प्रत्येक प्रभागात त्याच वेळेत घंटागाडी येते की नाही, प्रत्येक प्रभागातील कचरा नियमितपणे उचलला जातो की नाही, घंटागाडीत कचरा टाकला जातोय की नाही तसेच ओला व सुक्या कचर्याचे वर्गीकरण केले जातेय की नाही याचा या क्यूआर कोडद्वारे उलगडा होणार आहे.www.konkantoday.com