
खास संशोधनानंतर ओल्या काजूगरासाठी कोकण कृषि विद्यापीठाने विकसित केली विशेष जात
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली अंतर्गत अखिल भारतीय समन्वित काजू संशोधन प्रकल्प, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथे १५ वर्षाच्या संशोधनानंतर खास करून ओल्या काजूगरासाठी उपयुक्त गाजूचे बाण वेेंगुर्ला-१० एमबी या नावाने लागवडीसाठी शिफारस करण्यात आली आहे.हे वाण निवड पद्धतीने विकसित करण्यात आले आहे. या वाणामध्ये टरफलातील तेल कमी, टरफलातील जाडी मध्यम व काजूगर काढण्यास सुलभ आहे. ही विकसित केलेली नवीन जात शेतकर्यांसाठी मोठ्या प्रमाणात उत्पन्न देणार आहे.कोकणात ओल्या काजूगराला बाजारात प्रचंड मागणी असते. मोठमोठ्या शहरातील हॉटेल्समध्ये ओल्या काजूगरांचा वापर केला जातो. त्यामुळे या ओल्या काजूगाराला बाजारात खूत मागणी असते. ओले काजूगर हंगामात ३०० ते ४०० रुपये शेकडा दराने मिळतात. ओल्या काजूगराचा हंगाम जानेवारीपासून सुरू होतो. अन्य जातीच्या काजूच्या बियांमध्ये मोठ्या प्रमाणात चिक असतो व त्याची सालही जाड असल्यामुळे बियांमधून काजूगर काढणे फार अवघड असते.कोकणातील ओल्या काजूगराची वाढती मागणी व ओल्या काजू बीमधून ओले काजूगर काढताना येणार्या अडचणी लक्षात घेवून वेंगुर्ला १० एमबी या नावाने लागवडीसाठी शिफारस करण्यात आली आहे. या वाणाच्या काजू बीमधून ओले काजूगर काढण्यास सुलभ असल्यामुळे काजूगर काढण्यासाठी कमी वेळ खर्च होतो. त्यामुळे इतर वाणांच्या तुलनेत कमी वेळेत जास्त काजूगर मिळतात. www.konkantoday.com