खासदार राहुल गांधी आता संसदेत नव्या भूमिकेत

खासदार राहुल गांधी आता संसदेत नव्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. राहुल गांधी लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद भूषवत आहेत. काँग्रेसने हंगामी अध्यक्ष भतृहरि महताब यांना पत्र लिहून याबाबत माहिती दिली.2014 मध्ये मोदी सरकार स्थापन झाल्यानंतर गेल्या तब्बल दहा वर्षांपासून लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद रिकामी होतं. आता राहुल गांधी लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदावर काम करतील. भारतीय लोकशाहीत अशी अनेक पदं शक्तिशाली मानली जातात. यामध्ये विरोधी पक्षनेतेपदाचाही समावेश आहे. यातून राहुल गांधी यांना कॅबिनेटचा दर्जा मिळेल आणि त्यानुसार पगार, सुविधा दिल्या जातील.विरोधी पक्षनेतेपदाला कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा असतो. केवळ या एकाच गोष्टीमुळे विरोधी पक्षनेतेपद महत्त्वाचं नसतं. हा नेता विरोधी पक्षांची जबाबदारी सांभाळण्याबरोबरच अनेक संयुक्त संसदीय पॅनल आणि निवड समितींचा भाग असतो. यामध्ये सीबीआयचे संचालक, सेंट्रल विजिलेन्स आयुक्त, भारत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांची नियुक्ती, मुख्य सूचना आयुक्त, लोकायुक्त आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष, सदस्यांची निवड करणाऱ्या समितींचा समावेश आहे. विरोधी नेता म्हणून राहुल गांधी या निर्णयात थेट दखल देऊ शकतील. या समितींच्या निर्णयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह आता विरोधी नेता राहुल गांधी यांचं मत आवश्यक ठरेलं.राहुल गांधी सीबीआय आणि अशाच इतर संस्थांवरून सरकारवर आरोप करीत आले आहेत. अशात या संस्थांच्या वरिष्ठ पदांच्या नियुक्तीत त्यांचा महत्त्वाचा वाटा असेल. याशिवाय विरोधी नेता म्हणून राहुल गांधी लेखा समितीचे प्रमुख असतील. अशात सरकारच्या आर्थिक क्षेत्रातील निर्णयात त्यांचं बारीक लक्ष असेल आणि त्याचं विश्लेषण करू शकतील. लेखा समितीच सरकारी खर्चांचा तपास करते. अशात राहुल गांधींवर विरोधी नेत्यासह या जबाबदाऱ्याही आल्या आहेत.लोकसभेत विरोधी नेतेपद सांभाळणाऱ्या खासदाराला केंद्रीय मंत्र्याप्रमाणे पगार मिळतो आणि त्यानुसार भत्ता आणि इतर सुविधा मिळतात. विरोधी नेत्याला दर महिना 3.30 लाख पगार मिळतो. सोबतच कॅबिनेट मंत्र्यांप्रमाणे बंगला मिळतो. सोबतच चालकासह कार आणि जबाबदारी सांभाळण्यासाठी चौदा जणांचा स्टाफ मिळतो.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button