
कुंपणाच्या तारेत अडकलेल्या ब्लॅक पॅन्थर ला वन विभागाने दिले जीवदान!!!
राजापूर तालुक्यातील मौजे- कुवेशी येथे श्री. हर्षद हरेश्वर मांजरेकर यांचे आंबा कलम बागेच्या कंपाउंडला लावलेल्या तारेत वन्यप्राणी काळा बिबट्या (Black Panthar) अडकल्याची माहिती श्री. पद्मनाथ उर्फ पिंट्या कोठारकार यांनी परिमंडळ वन अधिकारी राजापूर यांना आज सकाळी ११.१५ वा. दूरध्वनी वरून दिली. सदरची घटना परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी यांना कळवून, त्यांचे समवेत वनपाल राजापूर, वनरक्षक राजापूर व रेस्क्यू टीमसह घटनास्थळी जाऊन कुंपणाच्या तारेच्या फासकित अडकलेल्या बिबट्याला पिंजऱ्यात घेवून कुंपणाच्या तारेतून मुक्त केले. ही कार्यवाही वनविभागातील अधिकारी यांच्या अनुभवाच्या मदतीने १५ मिनिटात त्यास पिंजऱ्यात घेण्यास यशस्वी झाले. त्यानंतर त्या बिबट्यास पशू वैद्यकीय अधिकारी डॉ प्राजक्ता बरगे व श्री प्रभाकर किनरे राजापूर यांचे कडून बिबट्याची तपासणी करून , सुस्थितीत असलेची खात्री केली. काळा बिबट्या (Black Panthar) नर जातीचा असून वय सुमारे ५ ते ६ वर्ष आहे. त्यानंतर विभागीय वनअधिकारी रत्नागिरी (चिपळूण) श्रीम.गिरिजा देसाई व सहाय्यक वनसंरक्षक चिपळूण श्री.वैभव बोराटे ,वनक्षेत्रपाल रत्नागिरी श्री.प्रकाश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बिबट्यास त्याचे नैसर्गिक अदिवासात मुक्त करण्यात आले . ही कामगिरी विभागीय वन अधिकारी श्रीमती गिरीजा देसाई मॅडम, सहाय्यक वनसंरक्षक श्री. वैभव बोराटे रत्नागिरी चिपळूण यांचे मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल श्री.प्रकाश सुतार, मानद वन्यजीव रक्षक श्री निलेश बापट ,वनपाल राजापूर श्री. जयराम बावदाणे ,वनपाल पाली श्री. न्हानु गावडे , वनरक्षक राजापूर श्री. विक्रम कुंभार, वनरक्षक रत्नागिरी श्री. प्रभू साबणे व रेस्क्यू टीमचे श्री.दीपक चव्हाण, श्री.विजय म्हादये, श्री.दीपक म्हादये, श्री अनिकेत मोरे ,श्री महेश धोत्रे , श्री.नितेश गुरव, श्री.संतोष चव्हाण , श्री.निलेश म्हादये यांनी पार पाडली. अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणीत सापडल्यास वन विभागाचा टोल फ्री क्रमांक १९२६ किंवा ९४२१७४१३३५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वन विभागाच्या वतीने श्रीमती गिरिजा देसाई विभागीय वन अधिकारी रत्नागिरी (चिपळूण) यांनी केले आहे.