आचारसंहितेमुळे माहे जुलैचा लोकशाही दिन नाही
रत्नागिरी, दि. 26 (जिमाका) : पदवीधर तसेच शिक्षक मतदार संघाची द्विवार्षिक निवडणूक 2024 ची आचारसंहिता 5 जुलैपर्यंत लागू असल्याने माहे जुलै 2024 चा जिल्हास्तरीय लोकशाही दिन साजरा होणार नाही, याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे उपजिल्हाधिकारी (सा.प्र) शुभांगी साठे यांनी कळविले आहे. जिल्हास्तरावर दर महिन्याला पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय लोकशाही दिन साजरा होतो. शासन परिपत्रक क्र.प्रसूधा 2011 प्र.क्र.186/11/18 अ, दि. 26 सप्टेंबर 2012 मधील परिच्छेद 5.7 नुसार आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे, अशा ठिकाणी लोकशाही दिनाचे आयोजन करु नये अशा सूचना आहेत. त्यानुसार पदवीधर तसेच शिक्षक मतदार संघाची द्विवार्षिक निवडणूक 2024 ची आचारसंहिता 5 जुलै पर्यंत लागू असल्याने माहे जुलै 2024 चा जिल्हास्तरीय लोकशाही दिन साजरा होणार नाही, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.000